उस्मानाबाद ,दि.३

पोलीस ठाणे, शिराढोन: 1)प्रेमदास जाधव 2)धनाजी जाधव 3)पद्मीनी जाधव 4)अविनाश जाधव, चौघे रा. सेवापुर तांडा, आष्टाकासार, ता. चाकुर 5)भीमराव राठोड, रा. शिराढोन 6)संजय राठोड, रा. जानवळ तांडा 7)माणिक पवार, रा. लातुर या सर्वांनी संगणमताने मायादेवी जिवाजी राठोड, रा. लामण तांडा, शिराढोन, ता. कळंब यांना लग्नाचे अमिष दाखवत होते. यातुन दि. 12.02.2021 रोजी 13.00 वा. सु. मायादेवी यांच्याकडून लग्न खर्चासाठी 2,50,000 ₹ रोख रक्कम व 5 ग्रॅम सोन्याची अंगठी घेतली होती. यानंतर नमूद सात जणांनी वाहन, जमीन खरेदीसाठी मायादेवी यांच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी करण्यास सुरवात केली. वारंवार पैशाची मागणी होत असल्याने मायादेवी राठोड यांनी त्यांना लग्नास नकार दिला असता त्यांनी मायादेवी यांना घेतलेले पैसे व अंगठी परत देन्यास नकार दिला. अशा मजकुराच्या मायादेवी राठोड यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top