नळदुर्ग,दि.१७:
येथिल नगपालिकेचे नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या दिवगंत मातोश्री कै. यमुनाबाई अहंकारी ( आम्मा ) यांच्या प्रथम पूण्यतिथी निमित्ताने नळदुर्ग येथील कोवीड सेंटरमध्ये रुग्णाना जेवणाचे वाटप करण्यात आले.
नळदुर्ग शहरात आम्मा नावाने परिचीत असलेले नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या मातोश्री यमुनाबाई अहंकारी यांचे मागच्या वर्षी १७ जूनला निधन झाले होते. गुरुवार दि.१७ जुन रोजी त्यांच्या पूण्यतिथीच्या निमीत्ताने अहंकारी परिवाराच्या वतीने कोवीड सेंटरमधील पेशंटला जेवण देण्यात आले.
यावेळी येथील आरोग्य अधिकारी स्मिता कूटे , कविता राठोड , अनिल राठोड , सुदर्शन जाधव , अजीत गायकवाड , संजय राठोड , या कर्मचा-यासह भिमाशंकर बताले आदीचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक नितिन कासार , नगरसेवक बसवराज धरणे , माजी नगरसेवक सुधिर हजारे , पत्रकार विलास येडगे , भाजपा शहर अध्यक्ष पद्माकर घोडके , युवा नेते उमेश नाईक , युवा सेनेचे ज्ञानेश्वर घोडके , भाजयुमोचे अध्यक्ष श्रमीक पोतदार , सामाजीक कार्यकर्ते अमर भाळे , नवल जाधव नाभीक समाजाचे नेते राजेंद्र महाबोले , युवा नेते प्रविण चव्हाण , युवा व्यापारी हालीम पटेल ,सूजीत सूरवसे , सचिन भूमकर ,मनसे विद्यार्थी शहर अध्यक्ष सूरज चव्हाण , अमोल मोहरीर , अजीत मोरे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी सर्वाचे आभार मानले. अहंकारी परिवारातील श्रीनिवास अहंकारी , व्यंकटेश अहंकारी , बाबूराव अहंकारी , वसंतराव अहंकारी बळवंत अहंकारी ' विकास अहंकारी , वैभव अहंकारी , योगेश अहंकारी यांच्याकडून जेवण वाटप करण्यात आले.