कळंब, दि. १७ : 
कोरोनाचे लसीकरण होण्यासाठी लसीकरण केंद्र प्रभागनिहाय लसीकरण केंद्र निश्चित करून ती लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी.
प्रभागनिहाय लसीकरण सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन वैद्यकीय अधिक्षक  यांना देण्यात आले आहे. 


लसीकरण जास्तीत जास्त नागरिकांना करण्याचे नियोजन शासनाने केले आहे. सध्या एकाच ठिकाणी लसीकरण चालू आहे. यामुळे त्या ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांना लसीकरणाच्या ठिकाणी जाण्याची अडचण निर्माण होत आहे. शहरातील नागरिकांचे लसीकरण सोयीस्कररीत्या विनागर्दी होण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांचे उस्मानाबाद नगरपालिकेने अशा प्रकारे प्रभाग निहाय लसीकरण सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याच धर्तीवर कळंब शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे यांना रुग्ण कल्याण समिती सदस्य सुशील तीर्थंकर, हर्षद, अंबुरे व उदयचंद्र खंडागळे यांनी दिले आहे.
 
Top