उस्मानाबाद,दि.१३ :
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील निवृत्त प्रा.उत्तमराव दत्तात्रय कदम पाटील वय ७६ वर्षे ,यांचे दिर्घ आजाराने सोलापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी रात्री 11.30 निधन झाले.
कदम यानी कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या भोर, सासवड, जोहे, नागठाणे, तुळजापूर,उस्मानाबाद आदी महाविद्यालयाच्या शाखेवर सेवा केली.त्यांच्या तीन मुली डाॅक्टर, एक मुलगी बी.फार्म,एक मुलगी सी.ए.असून मुलगा एम बी ए झाला आहे. अतिशय अडचणीतून त्यांनी आपली सर्व मुले उच्च शिक्षित केली आहेत. त्यांच्या पार्थिवावर रविवार दि. १३ जुन रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांच्या मुळगावी चिंचोली ता.तुळजापूर येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सुन,पाच विवाहित मुली,जावाई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते उस्मानाबाद येथील व्यवसायिक प्रसाद कदम पाटील यांचे वडील होत.