नळदुर्ग, दि.६ :
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने रविवारी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे व अधिक्षक धनंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे व डॉ. संतोष पवार यानी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. उद्धव भाले, प्रा. नेताजी जाधव, डॉ. दयानंद भोवाळ, डॉ. लक्ष्मण थिट्टे, डॉ. तुळशिराम दबडे, डॉ.सुभाष जोगदंडे, प्रा. मोतीराम पवार, प्रा. युवराज पवार, प्रा. चांदसाब कुरेशी, डॉ. रोहीणी महिंद्रकर, प्रा. संगीता मोरे, प्रा. विवेकानंद कुंभार, डॉ. संतोष पवार ,डॉ. महेश मोटे, लिंबराज मोटे, सुरेश पवार, गोविंद घंटे, सिद्धू सुतार, माणिक राठोड, शरद बागल, बारीकराव शिंदे, लिंबराज बेले, दिनेश पुदाले, भानुप्रकाश पुदाले, भागीनाथ बनसोड, उमेश सर्जे, अमोल मोहरीर उपस्थित होते.