उस्मानाबाद, दि.25
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी महिन्याच्या शेवटी संवाद साधत असतात. आत्तापर्यंत 77 भाग त्यांनी पूर्ण केले आहेत. देशाला बलाढय करण्यासाठी नवनवीन कल्पना व महत्वकांक्षी योजना सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचं काम ते रेडिओच्या मार्फत करत असतात.
रविवारी (दि27) रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेस जनतेसह विशेष करून शेतकऱ्यांच्या निगडीत विषयावर संवाद साधणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मन की बात कार्यक्रमाचे मराठवाडा संयोजक तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम मराठवाडयातील प्रत्येक तालुक्यात पाच ठिकाणी राबवण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ सर्व स्तरातील नागरिकांनी घ्यावा. तसेच या कार्यक्रमात जे नागरिक, शेतकरी, सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना प्रेरीत करण्यासाठी जे सहभागी झालेत त्यांनी कार्यक्रमानंतर याची माहिती,फोटो किसान मोर्चाच्या व्हॉटसअँप ग्रुपवर पाठवावी असे आवाहन मन की बात कार्यक्रमाचे मराठवाडा संयोजक तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी केले आहे.