उस्मानाबाद,दि.६ :

 पोलीस ठाणे, तुळजापूर: प्रकाश कांबळे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर हे दि. 05 जून रोजी गावातील एका किराणा दुकानालगत अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 6 बाटल्या व 14 ‍लि. गावठी दारु (किं.अं. 1,200 ₹) बाळगलेले तर याच दिवशी किशोर पाटील, रा. होणाळा, ता. तुळजापूर हे गावातील बस थांब्याजवळ एका स्कुटरवरुन अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 13 बाटल्या (किं.अं. 2,080 ₹) वाहुन नेत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

पोलीस ठाणे, बेंबळी: प्रविण शेरखाने, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद हे दि. 05 जून रोजी गाव शिवारात अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,200 ₹) बाळगलेले असलेले बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

पोलीस ठाणे, आनंदनगर: 1)उज्वला पवार, रा. रमाई नगर, उस्मानाबाद 2)संगिता काळे, रा. दत्तनगर, उस्मानाबाद या दोघी दि. 05 जून रोजी आपापल्या राहत्या घरासमोर अनुक्रमे 35 लि. व 5 लि. गावठी दारु (एकुण किं.अं. 1,870 ₹) बाळगलेल्या असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद यांच्या पथकास आढळल्या.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top