उस्मानाबाद ,दि.५
पोलीस ठाणे, कळंब: ईटकुर शिवारातील वाशिरा नदि पात्रात अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन महसुल विभागाच्या पथकाने दि. 19.05.2021 रोजी 18.00 वा. सु. नमूद ठिकाणी छापा मारला. यावेळी चालक- लक्ष्मण श्रीपती देसाई, रा. ईटकुर, ता. कळंब हे टाफे फर्ग्युसन कंपनीच्या विना नोंदणी क्रमांकाच्या ट्रॅक्टर- ट्रॉली मध्ये वाळू भरलेल्या स्थितीत आढळला. तसेच महसुल पथकाची चाहुल लागताच लक्ष्मण देसाई यांनी ट्रॅक्टरमधील वाळू जागीच ओतून ट्रॅक्टर- ट्रॉली घेउन निघून गेले. यावरुन सज्जा ईटकुरचे तलाठी- प्रविण पालके यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511 सह गौण खनिज अधिनियमम कायदा कलम- 21 (1) (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“चोरी.”
पोलीस ठाणे, आनंदनगर: सुलतान सादिक शेख, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 6157 हि दि. 02.06.2021 रोजी 17.00 ते 21.00 वा. दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमारुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुलतान शेख यांनी दि. 04 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे