जळकोट, दि.३० मेघराज किलजे :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे मान्यवरांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या नवीन हॉलमध्ये करण्यात आले.
स्वयं शिक्षण प्रयोग, उस्मानाबाद या संस्थेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने सदर विलगीकरण कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी कु. रोहिणी जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
तत्पूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयक जयश्री कदम यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, अंकुश लोखंडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम, सेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे, प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक महादेव राठोड, सहशिक्षक मोटे, आरोग्य विभागाच्या बालिका कदम, प्रभाग संघाच्या अध्यक्षा शिरिन इनामदार, सचिव सुरेखा कुंभार, सुनिता कोळगे, नौशाद तांबोळी, ज्योती कदम, आशा कार्यकर्ती रेणुका नळगे , शालिनी कडते, वैशाली कदम, लक्ष्मी लष्करे, सविता जाधव, मनीषा गायकवाड, वनमाला सुरवसे, अंगणवाडी सेविका गजरा डोके, ग्रामपंचायत कर्मचारी लहू कार्ले, विशाल जाधव, नागू स्वामी, प्रवीण कदम ,बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.