लोहारा , दि . २३
ऊसाचे थकित बिल शेतकऱ्यांना लवकर मिळाले नाही तर येत्या दि. २९ जुलै रोजी लोकमंगल कारखान्यावर मोर्चा काढण्याचा ईशारा निवेदनाद्वारे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लोहारा तहसीलदार यांना दिला आहे.
लोकमंगल कारखान्याकडून तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल देण्यात आले नाही. यामुळे कारखान्याकडे थकलेले ऊसाचे बिल लवकरात लवकर देण्यात यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तरी ऊसाचे बिले लवकर मिळाले नाहीत तर येणाऱ्या २९ जुलै रोजी कारखान्यावर बेधडक मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष कालिदास गायकवाड, लोहारा तालुका उपाध्यक्ष महादेव सुर्यवंशी, युवक तालुकाध्यक्ष आकाश भोरे,युवक उपाध्यक्ष विठ्ठल रणखांब,सोशल मिडीया तालुका प्रमुख सहदेव यादव,तालुका सचिव अभिजित जाधव,,महेश साठे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.