काटी , दि . १७ : उमाजी गायकवाड 

 काटी ता . तुळजापूर येथिल  मराठा सेवा समाज मडंळ सोलापूर   संचलित, येडेश्वरी कन्या प्रशालेचा एप्रिल 2021च्या एस.एस.सी. परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेमध्ये आलेले  प्रथम तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

 चि. कृष्णा मकरंद देशमुख 94.80 टक्के, चि. अनिल अरुण पांगे 92.20 टक्के, चि. शिवराज संजय काळे 92 टक्के, तर कु. सायली दयानंद जवळगावकर हि विद्यार्थीनी 85.80 टक्के गुण मिळवून विद्यार्थीनीमध्ये प्रथम आली आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही घवघवीत यश संपादन करीत येडेश्वरी कन्या प्रशालेने यशाची वैभवशाली परंपरा कायम ठेवली आहे.


 परिक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रशालेच्या वतीने संस्था अध्यक्ष मनोहरपंत सपाटे, जनरल सेक्रेटरी प्रा. महेश माने,  शालेय समितीचे चेअरमन मोहनराव गोरे,  प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश रणदिवे, तसेच सहशिक्षक  सहशिक्षक सुनिल खेंदाड, दिगंबर कदम, किशोर बनसोडे,गणेश गुंगे, तुकाराम गवळी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
 
Top