लोहारा दि. ३ : 

हजरत सय्यद मुहंमद जौनपरी माऊद उर्स निमित्त अलगाजी महेदवीया सोशल ट्रस्ट व सहयाद्री ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. लोहारा शहरातील मजीद ए मिरांजी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकुण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून अमूल्य सहकार्य केले.

या रक्तदान शिबिराकरिता प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी नगरसेवक अभिमान खराडे,शाम नारायणकर,माजी पं.स सदस्य दिपक रोडगे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,श्रीशैल्य स्वामी,जगदीश लांडगे, सचिन ठेले,मतीन शेख, नावेद खानापुरे उपस्थित होते.
यावेळी रक्तदात्यांना एक कुकर भेट स्वरूपात देण्यात आले.सदर रक्तदान शिबिरासाठी अलगाजी महेदवीया सोशल ट्रस्ट अध्यक्ष बाबुलाल मोमीन,उपाध्यक्ष युनुस मोमीन,सचिव महंमद हिप्परगे,गफुर मोमीन,हाजी जहांगीर हिप्परगे,खादर मोमीन,नुर मोमीन,गौस मोमीन,सय्यद चाऊस,खुनमिर मोमीन,इस्माईल मोमीन,मुबारक हिप्परगे आदी ने परिश्रम घेतले.
 
Top