काटी , दि .२९ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे नुकताच मंगरुळचे पोलीस पाटील लक्ष्मण माळी व त्यांचे तीन बंधूंनी माळी मोबाईल शॉपी, माळी फोटो स्टुडिओ सोबतच आता माळी इलेक्ट्रॉनिक्स दालनाचा शुभारंभ केला आहे. खास ग्रामीण भागातील नागरिकांसाठी योग्य किंमतीत सेवा देण्यासाठी मंगरुळमधील मुख्य चौकात माळी बंधूंच्या माळी इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आई शशिकला व वडिल राजेंद्र विठ्ठल माळी (पाटील) यांच्या हस्ते फित कापून थाटात शुभारंभ करण्यात आला.
पोलीस पाटील लक्ष्मण माळी व त्यांचे बंधू रामहरी माळी, नितीन माळी, व सचिन माळी यांचे माळी मोबाईल विक्री व दुरुस्ती हा व्यवसाय अविरतपणे सुरु असून काळानुरुप बदल करुन मोबाईल शॉपी सोबतच आता माळी इलेक्ट्रॉनिक्स या दालनाच्या माध्यमातून अद्यायावत असे ग्रामीण भागातील नागरिकांना ब्रॅण्डेड कंपन्यांचे फ्रीज, एलईडी टिव्ही, वाशिंग मशिन,फॅन, तसेच फर्निचर योग्य भावात देण्यासाठी एकमेव दालनाचा शुभारंभ करण्यात आला असून या दुकानात बजाज फायनान्स, टी.व्ही.एस. फायनान्स, क्रिडीट कार्ड, डेबिट कार्ड, बुलडाणा बॅंक फायनान्सची सुध्दा सोय उपलब्ध असल्याची माहिती माळी इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांनी दिली आहे.
त्यामुळे मंगरुळसह परिसरातील नागरिकांना आता इतर शहरांमध्ये जावून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल खरेदी करण्याची गरज नाही. कारण मंगरुळ मधील माळी बंधूंनी एकाच दालनात एकाच छताखाली या सर्व वस्तू मिळवून देण्याची किमया केली आहे.