टाळ मृदंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या जयघोषात वागदरीत वारकरी दिंडीची प्रदक्षिणा
वागदरी , दि .२१
आषाढी एकादशीला तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे टाळ मृदंगाचा गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी दिंडीने संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली.
येथील श्री संत सदगुरू भवानसिंग महाराज मंदिरामुळे वागदरी गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला असून आडीशे वर्षापूर्वी पासून येथील ग्रामस्थ हा वारसा भक्ती भावाने जोपासतात. दरवर्षी श्री संत भवानसींग महाराज मंदिरात यात्राही भरते. प्रत्येक एकादशीला विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
दरवर्षा प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीला श्री संत भवानसींग महाराज भजनी मंडळ वारकरी दिंडीने टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत मंदिराचे पुजारी ह.भ.प.सुरेशसिंग परिहार महाराज यांच्या आधिपत्याखाली गावाच्याकडेने प्रदक्षिणा फेरी काढून गावातील वातावरणात भक्तीमय केले. गावातील महिला, बालके भाविक भक्तनी या प्रदक्षिणा फेरीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविले. शेवटी श्रीसंत भवानसिंग महाराज मंदिर परिसरात गोल रिंगण करून विविध धार्मिक कार्यक्रमाने या प्रदक्षिणा फेरीची सांगता करण्यात आली.