तुळजापूर दि 25 : 

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शहरांमध्ये लाईटचे पोल उभे करण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेले विद्युत पोल आणि लाईन टाकण्याचे  काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रारी आहेत , याबाबत भारतीय जनता युवा  मोर्चाच्या लेटर पॅडवर विपीन शिंदे यांनी तक्रार दिली आहे.


शहरामध्ये गेल्या सहा वर्षापासून विद्युत पोल उभारणी व लाइन उभारणी काम रेंगाळत पडले होते अत्यंत विलंबाने या कामाला सुरुवात झाली . मात्र या कामाचा दर्जा आणि कामाची पद्धत याविषयी शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे . प्राधिकरणाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांमध्ये अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्यामुळे मनमानीपणे शासनाच्या पैशाचा खर्च शहरात होत आहे. मात्र शहरवासियांची या विकास कामाच्या दर्जाबाबत समाधान होत नाही. विविध कामासंदर्भात लोकांच्या तक्रारी आहेत.


विद्युत पोल उभारण्याचे काम रस्ते होण्या अगोदर करणे गरजेचे होते. मात्र तुळजापूर विकास प्राधिकरण आवर काम करणाऱ्या सर्व सदस्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अगोदर होणारी कामे नंतर होत असल्यामुळे रस्ते फोडणे आणि पूर्वी केलेल्या कामाची नासधूस करण्याचे प्रकार होत आहेत. प्राधिकरणावर आमदार , नगराध्यक्ष आणि तहसीलदार ही मंडळी असताना विकास कामांचा दर्जा चांगला राखण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे.


भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी बिपिन शिंदे यांनी यासंदर्भात आपली तक्रार निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे . परंतु तुळजापूर येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाच्या दर्जाकडे आजपर्यंत का लक्ष दिले नाही असा प्रश्न जनतेकडून विचारण्यात येत आहे.
 
Top