तुळजापूर दि २८ डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील तरुण शेतकरी चंद्रकांत सुभाष गोरे कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याने रोटरी क्लब तुळजापूर यांच्यावतीने गोरे परिवारातील दोन मुलांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले. कोरोनामुळे गोरे परिवारावर खूप मोठे संकट कोसळल्यामुळे तुळजापूरच्या रोटरी क्लबने या परिवाराला सानुग्रह मदत करण्याचा निर्णय घेऊन मदतीचा धनादेश कुटुंबियास सुपूर्द केला.
या कुटुंबातील मुलीसाठी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ३५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. जीवन सुकन्या योजनेसाठी गुंतवणूक करण्यात आले . रोटरी अध्यक्ष रामचंद्र गिड्डे यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला. यावेळी रो. अनिल रोचकरी रो.धीरज क्षिरसागर रो.सुनील क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामचंद्र गिड्डे यांनी ग्रामीण भागातील जीवन जवळून पाहिले आहे. त्यामुळे अपसिंगा येथील गोरे कुटुंबाच्या अडचणीवर मात करण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून ही छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. रोटरी क्लबच्या सामाजिक ध्येयधोरण आणि कार्यपद्धती याला अनुसरून ही मदत करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी चंद्रकांत गोरे यांचे शालेय जीवनातील इयत्ता पहिली ते दहावी शिकणाऱ्या मित्र मंडळींनी पुढाकार घेऊन व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून निधी संकलन केले. विधिज्ञ दिगंबर श्रीहरी भाकरे, राहुल तोडकरी, सखाहरी गोरे, दत्तात्रय डांगे, विधिज्ञ गोकुळ गोरे, बसवेश्वर खोचरे,
रघुनाथ क्षीररसागर, ज्ञानेश्वर तोडकरी, सचिन सरडे ,सुनील माळी, राजकुमार सरडे,विनोद माळी ,रवी घोडके मारुती यल्लाळ सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा गोरे, छन्नू रोकडे, संजय क्षीरसागर ,विशाल कदम, खंडू क्षीरसागर, रमजान शेख, सुनील माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले व समस्त अपसिंगा येथील ग्रामस्थ दयानंद हाके यांनी रोटरी क्लबचे आभार मानले . कार्यक्रमास गावातील माजी सरपंच रामदास गोरे, डॉ.श्रीहरी भाकरे , वनधिकारी नकाते व सुभाष गोरे यांची उपस्थिती होती.