काटी दि. १
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार तथा कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी त्रिंबक फंड यांचे चिरंजीव संजय फंड व वैभव फंड या बंधूंनी सावरगाव येथे बसस्थानक शेजारी शुक्रवार दि.2 जुलै रोजी सकाळी दहा वाजता आर्या ॲग्रो एंटरप्रायजेस या कृषी दुकानाचा शुभारंभ होणार आहे.
या दुकानाचे उद्घघाटन जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
सावरगावसह परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक उत्तम माहिती असणारे कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी त्रिंबक फंड यांच्या मार्गदर्शनाखाली संजय व वैभव फंड या बंधूंनी सुरू केलेल्या आर्या ॲग्रो एंटरप्रायजेस या दालनात आधुनिक तंत्रज्ञान, मार्गदर्शनासह सर्व प्रकारची खते, बी-बियाणे, औषधे हे एकाच छताखाली मिळणार असून शेतकऱ्यांसाठी हे कृषी दुकान
सोयीचे ठरणार आहे.
तरी परिसरातील शेतकऱ्यांनी या उद्घघाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आर्या ॲग्रो एंटरप्रायजेसचे वैभव फंड यांनी केले आहे.