काटी , दि. ४
तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील स्मार्ट डिजिटल ई लर्निंग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भगवान लक्ष्मण बाशेवाड वय 58 यांची सेवानिवृत्ती झाल्याने गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांच्या हस्ते तसेच ग्रामस्थ, शिक्षक,नातेवाईकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक भगवान बाशेवाड मुखेड जिल्हा नांदेड येथून येत प्रथम उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील लाखनगाव,दाभा, तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, रायखेल,लोहारा,गोंधळवाडी आदी ठिकाणी 30 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
गोंधळवाडी येथे आयोजित कार्यक्रमात भगवान बाशेवाड यांना निरोप देण्यात आला,शाळेच्या व शालेय व्यवस्थापण समिती, इंदिरा माध्यमिक प्रशाला मंगरूळ,ईष्ठमित्र मंडळी व नातेवाईक यांच्या वतीने भरपेहराव,शाल,श्रीफळ, फेटा शुभेच्छा देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव,काटी केंद्र प्रमुख सोलनकर,
सरपंच राजाभाऊ मोटे,व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिपान मोटे,रमाकांत वाघचौरे,ग्रामसेविका भाग्यश्री देवकते,
इंदिरा माध्यमिक प्रशाला मंगरूळ
मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे,जब्बार शेख, प्रभाकर चव्हाण, बालाजी डोंगरे, बंडू डोंबाळे,दाजीबा मिसाळ,शिवाजी पारदे, सुभाष बाशेवाड,गोंधळवाडी शाळेचे दत्तात्रय माळी, लालासाहेब मगर, व्यंकट तोटावार, श्रीमती जयमाला वटणे, श्रीमती मंजुषा भुसे,श्रीमती ज्योती कुलकर्णी, शंकर राऊत आदीसह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.