मातंग समाजातील कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या मातंग समाजातील कुटूंबियांना कर्ज स्वरूपात पत पुरवठा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे माजी सभापती शिवाजी गायकवाड यांचे निवेदन
काटी , दि . २९ , उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी तथा मातंग समाजाचे नेते तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोरोना महामारीत मातंग समाजातील कुटुंब प्रमुख मृत्युमुखी पडल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे.
त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. महात्मा फुले, संत रोहिदास महामंडळ व अन्य महामंडळा तर्फे कर्ज पुरवठा केला जातो. त्याच धर्तीवर मातंग समाजातील कोरोनामध्ये उघड्यावर पडलेल्यांच्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांना 4 लाखांपर्यंत कर्ज स्वरूपात पत पुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.