तुळजापूर दि ३ :
नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजापूर येथील दशावतार मठातील लसीकरण शिबिरास विक्रमी २४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
लसीकरण केंद्राचे उद्घाटन
महंत मावजीनाथ, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, नगरसेवक माऊली भोसले, सुनील रोचकरी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, श्रीनाथ शिंदे, किशोर गंगणे, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरपरिषद अधिकारी अभंगराव गायकवाड , कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक , उपजिल्हा रुग्णालयातील नवनाथ , पांडागळे अधिपरिचारिका सुलक्षणा मोरे , अशोक शेंडगे, जालिंदर राऊत, बापू रोचकरी, सुनील वाघमारे, महेंद्र कावरे, डाँक्टर, नर्स आदींची उपस्थित होती.
सदरील शिबिरास उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले . लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयाचे गुणवंत कदम, कृष्णा काळे, वैभव कांबळे, अजय कांबळे तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील जयप्रकाश हिरेपट , मधुकर पवार ,पवन सागवे , पार्वती चव्हाण ,आलीशिबा अडसूळ, यांनी परिश्रम घेतले .