नळदुर्ग दि. ३ : 

 तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी नळ ता. तुळजापूर  येथील नरखोरी तांडा येथे संत सेवालाल चौक नामफलकाचे अनावरण जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त चौकाचे अनावरण,प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे माजी सदस्य हरीष जाधव, गोर सेनेचे दिलीप जाधव, उपाध्यक्ष लखन चव्हाण, सचिव कुमार राठोड तालुकाध्यक्ष राजू चव्हाण, वसंत महाराज, बाळु राठोड, वसंत राठोड, गुड्डू राठोड, नेताजी राठोड, शिवाजी राठोड,प्रभु राठोड, बबलू राठोड यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
 
Top