उस्मानाबाद ,दि . १७
स्थानिक गुन्हे शाखा: नळदूर्ग येथील फुलवाडी टोलनाक्यापुढे 2 कि.मी. अंतरावर रस्त्यावर मध्यरात्री जॅक दिसल्याने मिनीट्रक चालकाने तो जॅक आपल्याला घेण्यासाठी ट्रक थांबवला असता अंधारात दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी ट्रक चालकास धाक दाखवून ट्रक मधील साहित्य लुटून नेले होते. यावरुन नळदुर्ग पो.ठा. येथे गु.र.क्र. 204 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री माने, पोना- सय्यद, पोकॉ- जाधवर, आरसेवाड यांचे पथक करत होते.
पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तेरखेडा येथील सुरज छगन शिंदे, वय 22 वर्षे यास पथकाने दि. 16 जुलै रोजी तेरखेडा येथून ताब्यात घेतले असता नमूद लुटीतील एक स्मार्टफोन त्यांच्या ताब्यात आढळल्याने पथकाने नमूद स्मार्टफोन व लुटीस वापरलेली त्याची मोटारसायकल जप्त करुन त्यास अटक केले आहे. लुटीतील उर्वरीत माल व त्याच्या साथीदारांचा तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.