मुरूम, ता. ५ :
येथील कागदी गल्लीत राहणाऱ्या ओमशांती परिवारातील अनुसयाबाई मारुती भालकाटे यांचे गुरूवारी (ता. ५ ) रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या असल्याने त्यांची या परिसरात वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच शहर व परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात्य दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावरती शुक्रवारी (ता. ६) रोजी सकाळी १० वाजता सार्वजनिक हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुरूम येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्राचे संचालक राजूभाई भालकाटे व बाळासाहेब भालकाटे यांच्या त्या मातोश्री होत.