उस्मानाबाद , दि . ६

उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद येथील प्रितम राजाभाऊ साबळे, वय 24 वर्षे यांचा दि. 31 जुलै रोजी रात्री 11.00 वा. पुर्वी गावातीलच काही पुरुषांनी पुर्वीच्या वादातून खून करुन पोबारा केला होता. 



त्यांचा ठावठिकाणा समजत नसल्याने उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पोनि- श्री. दत्तात्रय सुरवसे, सपोनि- श्री. शिंदे, श्री. रोकडे, पोहेकॉ- चौधरी, कांबळे, खंदारे, पोना- वाघमारे, भातलवंडे यांचे पथक त्यांच्या मागावर होते. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे भडाचिवाडी शेत शिवारात आरोपी लपून असल्याची माहिती मिळताच पथकाने भडाचिवाडी शिवारात सापळा रचून आरोपी- 1) सुरज शेषेराव चांदणे, वय 26 वर्षे 2) पवन शेषेराव चांदणे, वय 24 वर्षे 3) तेजस कृष्णा चांदणे, वय 21 वर्षे 4)सौरभ सत्यवान चांदणे, वय 23 वर्षे, सर्व रा. आंबेजवळगा, ता. उस्मानाबाद यांना दि. 06 ऑगस्ट रोजी अटक केली आहे.

 
Top