लोहारा , दि .१३

 
ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग लोहारा येथील उपअभियंता पी. व्ही. पाटील यांची महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभाग लातुर येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा बुधवारी शाल फेटा, हार घालून व भेटवस्तू देऊन कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन निरोप देण्यात आला. 

      
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य अॕड  दिपक जवळगे, वडगाव (गां) सरपंच बबन फुलसुंदर, जेवळीचे सरपंच मोहन पणुरे, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, अण्णासाहेब पाटील,   आर.जी कांबळे,  मदन सोमवंशी,  यांच्यासह अधिकारी व कर्मचारी व सरपंच, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी तुळजापुर येथील ग्रामीण पाणी पुरवठा  उपविभाग येथील उपअभियंता  देशपांडे यांच्याकडे लोहाऱ्याचा प्रभारी उपअभियंता म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे.
 
Top