तुळजापूर दि . ८ :

शिवसेनेच्या सर्व संपर्क अभियानामध्ये जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होत आहे खऱ्या अर्थाने हे संपर्क अभियान लोककल्याणकारी वाटत आहे असे उद्गार आमदार कैलास पाटील यांनी ता. तुळजापूर येथे काढले

आमदार कैलास पाटील यांनी याप्रसंगी बोलताना ,शिवसैनिकांच्या बळावरच शिवसेना उभी आहे. एखादी निवडणूक असली  की घरावर तुळशीपत्र ठेवून शिवसैनिक निष्टेने काम करतो.  हिंदूहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांची श्रद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे,  बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून शिवसैनिक काम करत आहेत असे सांगितले.

जुन्या आणि नव्या शिवसैनिकामध्ये समन्वय साधण्याचा या शिवसंपर्क मोहिमेतून आपला प्रयत्न असून शिवसैनिकांनी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक वाढवावा, असे आवाहन आमदार कैलास पाटील केले.

याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे-पवार,  जगन्नाथ गवळी,  सुधीर कदम, शाम पवार, सुनिल जाधव. संजय भोसले. समीर पटेल.भिमाशंकर गिराम.सतिश गिराम. नागनाथ लोहार.आपु  गवळी.अमोल घोटकर.घुळप्पा रेक्ष. अमीर शेख,  रोहित चव्हाण.प्रवीण भैय्या कोकाटे, प्रतिकबाप्पा रोजकारी .लखन परमेश्वरी कदम. लक्ष्मण माळी.बाळासाहेब शिंदे.सागर इंगळे.   शिवसैनिक भीमा आण्णा जाधव, महिला आघाडी तालुकाप्रमुख मुळे ताई, शिंदे ताई, बालाजी पांचाळ, उपसरपंच विनोद ठोंबरे, बापू नाईकवाडी, हणमंत जाधव, विशाल गायकवाड, दादा माळी, मनोज गायकवाड, सचिन एकंडे, शाखाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य मनोज गायकवाड, दिनेश भोजने, गणेश धनके, बाळासाहेब डोंगरे, याकूब इनामदार, महेश नवगिरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top