तुळजापूर , दि . २० :

अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी छोट्या छोट्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून कलावंतांना प्रोत्साहन मिळते, अशा कार्यक्रमांमधून चांगले कलावंत निर्माण होतात. दयावान गणेशोत्सव कार्यक्रमामुळे प्रभागात चांगली सांस्कृतिक वातावरण निर्माण झाल्याचे उदगार  माजी नगराध्यक्षा  सौ जयश्री विजय कंदले यांनी काढले.


 शहरातील वासुदेवनगर प्रभागातील दयावान युवा मंचने   गणेशोत्सव निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले.  त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. माजी नगराध्यक्ष सौ.जयश्री कंदले,  नगरसेवक विजय कंदले यांच्या  हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

दयावान युवा मंचतर्फे महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आणि लकी ड्रॉ स्पर्धा असे मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडले, या कार्यक्रमात प्रभागातील महिला, तरुणानी  उत्सर्फुतपणे  सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम १८ सप्टेंबर रोजी पार पडले , होमा मिनिस्टर या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सौ जयश्री धीरज नरसुडे यांना तर द्वितीय पारितोषिक प्रीती कुणाल रोगे आणि तृतीय पारितोषिक सौ राजकन्या शशिकांत पोपळे यांना समारंभपूर्वक नगरसेवक विजय कंदले व माजी नगराध्यक्षा जयश्री कंदले यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर लकी ड्रा मध्ये प्रथम पारितोषिक रजिया शेख तर द्वितीय पारितोषिक अब्दुल शेख आणि तृतीय पारितोषिक अथर्व कुलदीप गरड यांना लागले आहे  तसेच इतर ११ बक्षिसे  वाटप करण्यात आले आहेत.

स्पर्धा व लकी ड्रॉ मध्ये दयावान युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष  मिथुन पोपळे, दयावान युवा मंच मंडळाचे अध्यक्ष  सुरज गायकवाड, उपाध्यक्ष राजू चव्हाण, कोषाध्यक्ष भैरवनाथ रोटे , सचिव सोमनाथ देवकर,कार्याध्यक्ष  कुणाल रोंगे व  दादाराव भोरे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दयावान युवा मंचचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
 
Top