जळकोट,दि.२०
तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोरमन तांडा येथे बोरमन तांडा ते जळकोट वाडी रस्ता या दरम्यानच्या शेत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर
बोरमन तांडा येथे वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, उपसरपंचपती बसवराज कवठे, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, गिरीश नवगिरे, गोर सेना तालुका अध्यक्ष राजू चव्हाण, चेअरमन लोकू राठोड, मोहन नाईक, राजू भिका चव्हाण, बाबू राठोड, सुभाष राठोड, राजू थावरु राठोड, कारभारी प्रेमनाथ चव्हाण, दासू राठोड, तुळशीराम चव्हाण, अजित कांबळे, सतीश राठोड, संतोष मडोळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.