नळदुर्ग , दि . २१

नळदुर्ग शहरातील नाभिक समाजासाठी  मंजुर असलेल्या  सभागृहाचे काम येत्या आठ दिवसात सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा नाभिक समाजाच्या वतीने उस्मानाबाद  जिल्हाधिकारी याना निवेदनाद्वारे दिला आहे.

 
नळदुर्ग येथील स.न. २१७/२ या जागेतील नगर परिषदेच्या आरक्षित जागेवर नाभिक समाजासाठी  सभागृह मंजूर होऊन कामाचे टेंडर देण्यात आले आहे. परंतु संबधीत गुत्तेदाराने अजुनही या  सभागृहाचे काम चालू केले नाही..हे बांधकाम लवकरात लवकर चालु करावे ह्यासाठी नाभिक समाज व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी याना निवेदन देवुन  आठ दिवसात  काम सुरु नाही झाल्यास उपोषण करण्याचा  इशारा देण्यात आले आहे.


यावेळी नाभिक समाजाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण  माने , जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय राऊत नगरसेवक दाजी पवार , स्वातंत्र्य सेनानी बलभीम मुळे गुरुजी , संदिप सुरवसे , महादेव माने संभाजी महाबोले , भगवान माने, समीर सुरवसे नेताजी महाबोले,  आबा आगलावे, गंगाधर सुरवसे , संतोष महाबोले  आदी उपस्थित होते.
 
Top