वागदरी , दि .२९ :एस.के.गायकवाड :
गेल्या चारपाच दिवसापासून सतत संततधार पावसाने अतिवृष्टी होऊन नळदुर्ग, वागदरी व परिसरातील काढणीला आलेले सोयाबीन पिकांच्या फडात पाणी साचल्याने पिक काढणीला खिळ बसली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाआहे.
एक तर सोयाबीन पिकांची वाढ व फुले, शेंगा लागून दाणे भरणाच्या मोसमात पावसाने जवळपास दीड महीना दडी मारल्याने पिकांचे पोषण म्हणावे तसे झाले नाही. परिणामी सोयाबीनचे दाणे कुपोषित होऊन बारीक झाले.यामुळे आगोदर मोठे नुकसान झाले आहे.त्यात अधुनमधून पावसाने हजेरी लावल्याने कसे बसे जमिनीवर तग धरलेल्या सोयाबीनचे पिक काढणीला आले आहे. सोयाबीन काढणीला मोठा वेग आला होता.परंतु गेल्या चारपाच दिवसात सततच्या संततधार पावसाने अतिवृष्टी होऊन सोयाबीनच्या पिकात पाणी थांबल्याने पिक काढणी थाबली आहे.
अनेकांच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले आहेत. सोयाबीन पिक काळे पडून खराब झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक वाया जावून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून विनाअट सरसकट नुकसान भरपाई व विमाची रक्कम द्यावी. यापूर्वी अग्रीम करण्यात आलेली २५%विमा रक्कमेचे त्वरित वाटप करण्यात यावे अशी मागणी होत आहे.