परंडा , दि. १२

 तालुक्यातील कुभेफळ सज्जाचे तलाठी अनिता पाटिल यानी कुंभेफळ, साकत बु , पिस्तम वाडी , रोहकल, हे चार गावे आसून या भागातील शेतकऱ्यांनी ई पिक पाहाणी अँपचा  शेतकऱ्यांनी  लाभ घ्यावा असे आवाहन तलाठी अनिता पाटील यानी केले आहेत.

 शासनाच्या महसूल कृषीच्या विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची माहिती तलाठी अनिता पाटील  यांनी दिले  सदरील कार्यशाळेत ई पीक पाहणी संदर्भात संपूर्ण माहिती  दिली असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन रविवार दि. १२  रोजी  शेतात जाऊन माहिती देण्यात आली. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद स्वता करता येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके, फळ पिके बांधावरील झाडे ,जलसिंचन साधने, पडीक जमीन याची नोंद करता येणार आहे.  


अनुदान, पिक विमा ,पिक कर्ज याकामी हाच पिक पेरा ग्राहय  धरला जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ॲपद्वारे करावी असे आवाहन  करीत तलाठी अनिता पाटील  यांनी दिली .

या  कार्यशाळेत उपस्थित असलेले सरपंच  बापू कोटोळे, उपसरपंच फारूख शेख ,पोलीस पाटील अतिक काजी ,सादीक शेख ,सदस्य राम आवळे , मुस्ताक शेख
दत्तू मेंडे ,आप्पा कुटोळे
करीम शेख, बळीराम आवाळे ,जावेद पठाण ,रफिक शेख ,दयानंद नायकुडे 
अरुण तिपाले ,अहमद शेख, रामा नलवडे  बारसकर, वसीम शेख ,अहमद शेख ,गोरख नायकोडे, बाबा अडागळे,  आदिसह शेतकरी उपस्थित होते.
 
Top