काटी , दि .१२ उमाजी गायकवाड

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा तुळजापूरचे सुपुत्र ॲंड. धिरज पाटील तथा कदम पाटील परिवाराच्या वतीने रविवार दि.10 रोजी सकाळी अकरा वाजता नवरात्र व ललितापंचमीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष  संतोषा बोबडे , नगराध्यक्ष सचिन रोचकरी,  तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब पाटील, जनता बॅंकेचे चेअरमन मोदानी आदीसह तालुक्यातील सर्व पक्षीय मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत "श्रीमान पाटील वाडा" हॉटेलचा  शुभारंभ करण्यात आला. 


तुळजापूर-सोलापूर  राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर सांगवी (मार्डी) येथे सुरु करण्यात आलेले "श्रीमान पाटील वाडा हॉटेल" चिरेबंदी व पौराणिक दगडी बांधणीचे व आकर्षक रंगरंगोटी, कौलारू छत, बैठक व्यवस्थेसाठी करण्यात आलेले आसन व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ॲड. धिरज  पाटील तथा कदम पाटील परिवाराने हॉटेल व्यवसायात नव्याने पदार्पण केले असून या हॉटेलला शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील सर्वच पक्षातील पदाधिकारी,नागरिक, व्यवसायिक, डॉक्टर वकील, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. या हॉटेलमुळे तुळजापूरच्या सौंदर्यात भर पडली असून  तालुक्यातील सर्व खवय्यांना व  तुळजाभवानी देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अस्सल मराठमोळी जेवणाची मेजवानी मिळणार आहे. त्याचबरोबर  मांसाहारी व शाकाहारी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची मेजवानी मिळणार आहे. या हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 
        


 
Top