तुळजापूर , दि . ०६
सध्या व्यावसायाचा अनेक संधी असून कमीत कमी भांडवलावर ब्युटी पाॅर्लर व्यावसाय करता येऊ शकतो. तरूणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः चा व्यवसाय सुुरू करून स्वावलंबी होण्यााचे आवाहन सौंदर्य प्रसाधने तज्ञ व्यावसायिक अवंतिका अमृतराव यांनी केले आहे.
शहरातील " पुष्कराज काॅस्मेटीक्स " मध्ये जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा ८ वी ते १० वी च्या विद्यार्थीनींना "ब्युटी अॕन्ड वेलनेस" या विषयावर तज्ञ व्यावसायिक म्हणून मार्गदर्शन करताना अवंतिका अमृतराव बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सविता लोंढे, नागरबाई शिंदे आदी शिक्षीकांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अमृतराव यांनी सौंदर्य प्रसाधन व्यावसायातील संधी ची माहिती मुलींना दिली. याशिवाय भांडवल उभारण्यासाठी शासकीय योजना तसेच वित्तीय संस्था ची कशी मदत घेता येईल या विषयी मार्गदर्शन केले.
"ब्युटी अॅन्ड वेलनेस" या विषयाचा अभ्यास क्रमात नव्याने समावेश करण्यात असून यावेळी जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील ८ वी ते १० वी च्या एकूण ८० विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.
प्रास्ताविक सविता लोंढे यांनी तर आभार मानले.
सौंदर्य प्रसाधन व्यावसायात अनेक संधी
बदलत्या जीवनशैलीत मानवाचा दृष्टिकोन बदलला आहे. आपल्या दिसण्या विषयी, सौंदर्या विषयी जागरूकता वाढली असल्याने सौदर्य प्रसाधन व्यावसायाला चांगले दिवस आले आहेत. या संधीचा फायदा घेत तरुणींनी सौंदर्य प्रसाधन व्यवसायात करीअर करण्याचे आवाहन अवंतिका अमृतराव यांनी केले आहे.