जळकोट, दि.२८ : मेघराज किलजे


षटकोळी साहित्यप्रेमी समूहाचे तिसरे ऑफलाईन काव्यसंमेलन श्री .क्षेत्र देवगड ( जि.अहमदनगर) येथे १ व २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या संमेलनाचे आयोजन षटकोळी साहित्यप्रेमी समूहाच्या  कवयित्री संध्याराणी कोल्हे व कवी नितीन गायके यांनी केले आहे.


  संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी व लेखक श्री .विठ्ठल घाडी हे राहणार आहेत. तर उद्घाटक साहित्यिक कवी डाॅ.कुलदिप पवार हे करणार आहेत. हे संमेलन दोन दिवशीय आहे. दोन्ही दिवसासाठी वेगवेळे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यामध्ये   प्रमोद पाटील, प्रा.डाॅ.संतोष तागड, दैवशाला पुरी, कांचन ठाकूर, ऍड.शंकर कदम, आनंदा साळवी, गुंफा कोकाटे, राणी चोपडे हे आहेत. १ जानेवारी रोजी सायंकाळी पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा  व काव्यसंवाद मैफिल होणार असून २ जानेवारी रोजी निमंत्रित कवीवर्यांचे कवी संमेलन होणार आहे.


षटकोळी साहित्यप्रेमी समूहातर्फे  डॉ.कुलदीप पवार यांना जीवनगौरव, श्रीमती संगिता झेंडे यांना जीवनगौरव, डॉ.प्राचार्य गुंफा कोकाटे यांना ज्ञानज्योत, ऍड .कवी शंकर कदम यांना काव्यरत्न, कवी गुलाबराजा फुलमाळी यांना काव्यभूषण, कवी रज्जाक शेख यांची काव्यज्योत पुरस्कारासाठी  निवड झालेली आहे.
 
Top