तुळजापूर , दि . २२
सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष जितेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच परिषद सदस्यांच्या वतीने कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात महाआरती करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष जितेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी सरपंच परिषदेच्या वतीने त्यांना निरोगी दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात सरपंच परिषदेच्या माध्यमातून चांगले कार्य घडो, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या मुलभूत समस्यांसह शासनामार्फत गावच्या सर्वांगिण विकासासाठी सरपंच, उपसरपंचाच्या विविध मागण्या पूर्ण होवोत व त्यांच्या माध्यमातून गाव स्वावलंबी होण्यासाठी व गावच्या विकासासाठी चालना मिळो, गावच्या विकासाचे विविध प्रश्न मार्गी लागावेत असे मनोभावे साकडे घातले.
सरपंच परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा जिनत सय्यद, प्रदेश संघटक कोहिनूर सय्यद, प्रदेश सरचिटणीस प्रवीण रणबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुजीत हंगरगेकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण व्हरकट, सरपंच परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल आगलावे, यांच्यासह सरपंच परिषद सदस्य काटी ग्रामपंचायत सदस्य भैरी काळे,सोनिया ब्रिगेड तालुकाध्यक्ष जीवन जोत,आरळी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य राहुल पौळ, माजी ग्रामपंचायत सदस्य मकरंद बामनकर, यल्लप्पा कुराडे आदींनी तुळजाभवानी दरबारी महाआरती करून शुभेच्छासह अभिष्टचिंतन केले.