नळदुर्ग दि. २७ :
एका शिक्षकाने उस्मानाबाद ते नळदुर्ग असे 53 किलो मिटर रनिंग करुन आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करुन विद्यार्थी व युवकापुढे आदर्श निर्माण केल्याने या शिक्षकाचे सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे.
तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथील (लमाण तांडा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणुन कार्यरत असलेल्या साहेब शिवाजी पवार हे उस्मानाबाद तालुक्यातील जहागिरदारवाडीचे रहिवाशी आहेत. त्यांचा 38 वा जन्मदिवस व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन उस्मानाबाद ते नळदुर्ग असे 53 किलोमिटर सलग सहा तासात रनिंग करत नळदुर्गला पोहचले. त्यांनी व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी दि. 27 जानेवारी रोजी उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौकातुन पहाटे चार वाजता नळदुर्गच्या दिशेने धावण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांचे मित्र दत्तात्रय कळबंडे, दिपक कांबळे हे सुरक्षेच्या दृष्टीने साहेब पवार यांच्या मागे दुचाकीवरुन त्याना सहकार्य केले.
नळदुर्ग येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेच्या वतीने साहेब पवार या शिक्षकाचे मुख्याध्यापक दत्तात्रय आलुरे, तुळजापूर लाईव्हचे संपादक शिवाजी नाईक यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालुन त्याना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी तुळजापूर लाईव्हची दिनदर्शिका भेट देण्यात आली.
यावेळी पवार हे बोलताना म्हणाले की उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व तरुण पिढीस व्यायामाचे महत्व व यातुन संदेश देण्याच्या हेतुने रनिंग केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास सहशिक्षक बिलाल सौदागर, सहशिक्षीका ललिता आलुरे, सुरेखा मोरे, वंदना चौधरी, सुंदर भालकाटे, सैय्यद मोहोयोद्दीन, खलील इनामदार, निजामोद्दीन इनामदार, सेविका सुनिता यादगीरे, जि.प. मुलांचे हायस्कुलमधील शिक्षीका कुलकर्णी अंजली, पाटील वर्षा, शेख आसिफून्नीसा, हन्नुरे जिनत, मैंदर्गी निलोफर, सय्यद तस्नीम, लोहार आशोक, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राम सातपुते आदीजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार बिलाल सौदागर यांनी मानले.