खामसवाडी दि.२९ :
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, प्रियदर्शनी सार्वजनिक वाचनालय, जिल्हा परिषद प्रशाला, जगदंबा कन्या प्रशाला,वस्ती शाळा आदी ठिकाणी साजरा करण्यात आला.यावेळी गावचे उपसरपंच प्रभाकर शेळके यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहन करण्यात आले. तर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी येथे चेअरमन संजय पाटील यांच्या हस्ते तर प्रियदर्शनी सार्वजनिक वाचनालय येथे संस्थापक अध्यक्ष डी.एन. यादव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी कर्मचारी, पदाधिकारी,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.