काटी , दि . २९ :
 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सुदामती भैरीनाथ गुंड वय ७२  यांचे शुक्रवार दि. २८ रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारा दरम्यान  निधन झाले.


 त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी दुपारी उपचारासाठी सोलापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराचा  झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल गुंड यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी,जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top