कळंब , दि . १७ : भिकाजी जाधव
मुलीच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च टाळुन एका डाँक्टर पित्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवुन कन्येचा वाढदिवस साजरा केला आहे .
हसेगाव केज येथील रहिवासी डॉ. अभिजित महादेव यादव यांनी आपल्या मुलीच्या कु आश्लेषा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त गावातील जिल्हा परिषद हसेगाव शाळेतील 10 गरजवंत विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या व 291 विद्यार्थ्यांना पेन वाटप करून आदर्श पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
याप्रसंगी डॉ. अभिजीत यादव, उत्तम यादव शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर जगदाळे, अमोल बाभळे, प्रशांत घुटे, राजकुमार गुंजाळ, समाधान भातलवंडे , विकास खारके,कालींदा समुद्रे, लक्ष्मी कोकाटे, विद्या समुद्रे, प्रतिभा बिडवे हे उपस्थित होते,