नळदुर्ग , दि . ०४ 
शुक्रवार  दि. ४ मार्च रोजी तुळजापूर तहसिलदार सौदागर तांदळे  यांनी प्रणिता व त्याच्या  कुटुंबियांची  रामतीर्थ ता . तुळजापूर  येथे  घरी जावुन भेट घेतली. यावेळी शासनाच्या योजनेच्या माध्यमातुन या कुटूंबास मदत करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार  तांदळे यानी सांगितले .


  भारताला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या रामतीर्थ ता.तुळजापूर येथील प्रणिता मोहन पवार हिच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ' अशा बातम्या नुकत्याच कांही वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या . याची तातडीने दखल घेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी हि बाब मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार प्रणिता व कुटुंबियांची तिच्या राहत्या घरी मनसेच्या पदाधिका-यासह भेट देवुन प्रणिता व तिच्या कुटुंबियांना मदत देवून प्रणिताच्या पुढील कराटे प्रशिक्षण व संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली. 

यावेळी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी प्रणिताशी फोनवरून बोलताना ' बाळा , मी तुझ्या पाठिशी असुन, तु यापुढे कसलीही काळजी न करता शिकत रहा . तुला कांहीही कमी पडु दिले जाणार नाही असे सांगितले.   हि घटना संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वच वर्तमानपत्रांतुन व सोशल मिडीयाद्वारे वाऱ्यासारखी पसरली . याची गंभीर दखल घेवुन उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार शुक्रवार  दि. ४ मार्च रोजी तुळजापूर तहसिलदार सौदागर तांदळे  यांनी प्रणिताची व कुटुंबियांची त्यांच्या घरी रामतीर्थ ता . तुळजापूर  येथे भेट घेवून, या संपूर्ण कुटुंबाला मिशन वात्सल्य, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, यांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ तात्काळ मिळवून देवु . कोणत्याही परिस्थितीत या कुटुंबियांशी प्रशासन सोबत असेल . आपण शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रणिताच्या सर्व अडचणीं बाबत चर्चा करून त्या तात्काळ सोडवुन मदत मिळणेबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी   सांगितले .
   

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, सरपंच बालाजी राठोड, लक्ष्मण राठोड, गुरुदेव राठोड, पत्रकार सतिश पिसे, सतिश राठोड, ग्रामसेवक अनिल पाटील , मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी तुकाराम कदम, मनसे जिल्हासचिव जोतिबा येडगे, नळदुर्ग शहरसचिव प्रमोद कुलकर्णी, रामु चव्हाण, बाबु राठोड यांच्यासह ग्रामस्थ  उपस्थित होते .

सरपंच बालाजी राठोड, रामतीर्थ

  प्रणिताला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी मोठे प्रयत्न केले . तसेच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी प्रणिता व कुटुंबियांना धीर देवून पाठिशी उभे राहिले
 
Top