चिवरी , दि . २७ : राजगुरू साखरे:
यूजीसी कडून फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षा या देशपातळीवरील सहाय्यक प्राध्यापक परीक्षा मध्ये तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शेतकरी कुटुंबातील तानाजी प्रभाकर येवते यांनी यश संपादन केले आहे.
येवते यांनी देशातून लाइफ सायन्स बॉटनी परीक्षेमध्ये ८८ व्या क्रमांक पटकावला आहे. या यशाकरता त्यांना भाऊराव चौसष्टे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सध्या ते संजीवनी कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. येवते यांनी प्राथमिक शिक्षण दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालय चिवरी येथे केले, माध्यमिक शिक्षण नळदुर्ग येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात, तर पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद विद्यापीठांमध्ये केले.
चिवरी येथील छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील तानाजी येवते यांनी अतिशय खडतर परिस्थितीमधे यश संपादन केल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.