चिवरी ,दि.१२


तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि. ५ एप्रिल पासून सुरू असलेल्या    ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सोमवार दि,११ एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य पांडुरंग महाराज रेड्डी यांच्या काल्याच्या किर्तनाने  तर ह भ प गुरुवर्य महेश महाराज माकणीकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाने उत्साहात सांगता करण्यात आली. 


 गुरुवर्य ह.भ.प महेश महाराज माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, यानिमित्त सप्ताह कालावधीत दैनंदिन काकड आरती, महापूजा, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण ,भागवत कथा,गाथा  भजन , प्रवचन , नामजप, हरिजागर, हरी किर्तन आदी कार्यक्रम पार पडले. या सप्ताहांत येवती, अणदुर, धनगरवाडी, चिकुंद्रा,आरळी,काळेगाव, इटकळ, बसवंतवाडी, शिरगापुर, फुलवाडी, हिप्परगा (ताड), चिंचोली , किलज, सलगरा , होर्टी, बाभळगाव आदी गावातील भजनी मंडळींनी सहभाग घेतला होता. सप्ताह यशस्वी साठी गावातील सर्व मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
 
Top