जळकोट , दि.१८

         
येथून जवळच असलेल्या होर्टी अंतर्गत जळकोटवाडी (न)येथे  शाळापूर्व तयारी मेळावा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .शाळा पूर्वतयारी मेळाव्यानिमित्त  जि. प. प्रा. शाळा   सकाळी गावामध्ये  विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा प्रदान करून ग्रंथदिंडीसह  प्रभातफेरी काढण्यात आली,


.प्रथमतः सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतीमेचे पुजन करून सन २०२२-२३साठी इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उमेश भोसले यांनी शाळापूर्व तयारी संदर्भात मार्गदर्शन केले .शाळेचे सहशिक्षक अशोक राठोड यांनी कृती आराखडा विषयीच्या डेमोचे प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थित  शिक्षणप्रेमीचे आभार मानले. याप्रसंगी गावचे सरपंच शिवाजीराव कदम ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागनाथजी साळुंके , सदस्या  अर्चना जामगे तसेच अंगणवाडी सेविका सरोजा कदम ,नम्रता कदम कलावती राठोड,  पमाबाई साळुंके व शिक्षण प्रेमी  उपस्थित होते.
 
Top