उस्मानाबाद ,दि . १५
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्ह्याची कार्यकारणी पुनर्गठित करण्याकरिता प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.के. मुरळीकर, युवक प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने, प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निवड करण्यात आली.
यावेळी मराठवाडा (विभागीय) कार्याध्यक्षपदी बबनराव वाघमारे यांची सर्वानुमते निवड झाली तसेच उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी ॲड गणपती कांबळे व अण्णासाहेब सातपुते यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्षपदी भैरवनाथ कानडे , पांडुरंग म्हेत्रे , जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मधुकर बिद्री, सिकंदर अंगुले, नवनाथ कांबळे,उमेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर युवक जिल्हाध्यक्षपदी विकास कदम व ज्ञानेश्वर बनसोडे , युवक जिल्हा कार्याध्यक्ष राघवेंद्र चाबुकस्वार, तुळजापूर तालुका अध्यक्ष म् केरनाथ कांबळे, कळंब तालुका अध्यक्ष गणेश राऊत ,लोहारा तालुका अध्यक्ष बळीराम बनसोडे, शहराध्यक्षपदी आकाश अडसूळ यांची नेमणूक करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने राष्ट्रीय चर्मकार "कर्मचारी महासंघ" याची उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथमच कार्यकारिणी जाहीर केली असुन जिल्हाध्यक्षपदी हनुमंत माने , जिल्हा सचिव म्हणून सुशील कुमार पौळ व अशोक वाघमारे यांची निवड करण्यात आली. जिल्हा संघटक म्हणून प्रशांत माने तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सुरेश गायकवाड , जिल्हा प्रवक्ते विजय कुमार माने , जिल्हा कोषाध्यक्ष बामणीकर दत्तात्रेय आदीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
याबरोबरच गटई कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी शहाजी शेरखाने यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नुतन पदाधिका-याचे सत्कार करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल कबाडे, राम कबाडे, तानाजी जाधव, गणेश तूपसमुद्रे, डॉ. अनिल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य कार्यकारणी सदस्य विनोद कुमार पवार, धोंडीराम वाघमारे, शांतिनाथ शेरखाने, साहेबराव शेरखाने ,रवी रोहिदास, आश्रुबा मुंडे, तन्मय वाघमारे ,जयपाल शेरखाने आदी बांधवांनी नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबनराव वाघमारे तर प्रास्ताविक गणपती कांबळे व मुख्य मार्गदर्शक सी.के. मुरळीकर, युवक प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने यांनी केले व आभार सुशील पौळ यांनी मानले.