जळकोट, दि.६ :मेघराज किलजे:
महाराष्ट्रातील लिंगायत समाज हा ओबीसीचा प्रमूख घटक आहे. २०१४च्या शासन निर्णयनुसार राज्यातील लिंगायत समाजातील ११पोट जाती व ३उपजातीना ओबीसी आरक्षण मिळाले आहे. याचा लाभ १० टक्के लिंगायत समाजाला झाला आहे. परंतु लिंगायत समाजातील ९०% शाळेतील दाखल्यावर हिंदु- लिंगायत चुकुन लिहले असल्यामुळे हे सर्व शैक्षणीक व सामाजिक द्रष्ट्या आरक्षणा पासून वंचित असल्याचे दिसुन येत आहे..
गेली सात वर्षे मागास वर्ग आयोगा पुढे व लिंगायत आरक्षण समिती यांच्या अनेक बैठका होवून सुध्दा आज पर्यंत निर्णय घेण्यात आला नाही. सकल हिंदू लिगांयतना ओबीसी दाखले दया अशी मागणी लिंगायत संघर्ष समिती, महाराष्ट्र मराठवाडा विभागचे उपाध्यक्ष शिवानंद कथले ,जागतिक लिगांयत महासभेचे प्रदिप वाले, समन्वयक राजशेखर तंबाके ,प्रवीण बिराजदार यांनी केल्यानंतर मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी औरंगाबाद उपकमिटी यांना दिलेल्या दि. १८-११-२०२१ च्या पत्रानुसार लिंगायत समाजाचा त्वरित इम्परिकल डाटा गोळा करून पुढील मीटिंग पूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंदू- लिंगायत यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचे सकारात्मक प्रतिसाद ना. विजय वड्डेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच पुढील बैठकीमध्ये मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी संबधीत विभागाशी चर्चा करून निधी देण्याचे विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी लिंगायत समाजाचे प्रतिनिधी , मुख्य सचिव ईत्तर मागास व बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई व संबधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थीत होते.