नळदुर्ग, दि. २४ : विलास येडगे

  येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निखिल काशिनाथ घोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      

गेल्या दोन वर्षानंतर यावर्षी नळदुर्ग येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यासाठी समितीची नुकतीच भाळे कॉम्प्लेक्स येथे बैठक पार पडली या बैठकीत सन  २०२२--२३ या वर्षासाठी समितीची नुतन कार्यकारीणी  पुढीलप्रमाणे निवडण्यात आली आहे.
       अध्यक्ष निखिल काशिनाथ घोडके, उपाध्यक्ष गजानन हळदे, मयुर हुलगे, सचिव ज्ञानेश्वर घोडके, कोषाध्यक्ष महेश घोडके, व्यवस्थापक विलास येडगे, पद्माकर घोडके, दीपक घोडके, अमर भाळे,प्रभाकर घोडके, अमित शेंडगे,लखन खांडेकर, बाळासाहेब घोडके, अजित दोपारे.
      

यावर्षीची जयंती मोठ्या उत्साहात तसेच वृक्ष लागवड करण्याबरोबरच  विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात येणार असल्याचे समितीचे नुतन अध्यक्ष निखिल घोडके यांनी म्हटले आहे.
 
Top