वागदरी , दि . २९
त्यागमुर्ती महामाता रमाई आंबेडकर यांच्या ८७ व्या स्मृती दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील दाळींब ता.उमरगा येथे त्यांना विनम्र आभिवादन करण्यात आले.
दि.२७ मे रोजी महामाता रमाई आंबेडकर यांच्या ८७ व्या स्मृती दिनानिमित्त दाळींब येथील बुद्ध विहारा मध्ये आंदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी येथील जेष्ठ कार्यकर्त्यां अंजनाबाई भिमराव सुरवसे व उंबर गायकवाड यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांंचे पूजन करून माता रमाई आंबेडकर यांना आंदरांजली वाहून आभिवदन करण्यात आले.
यावेळी सूधाकर गायकवाड, खंडेराव सुरवसे, गुलाब गायकवाड, विशंभर गायकवाड, मारूती कांबळे, मधुकर सुरवसे,वषिकेत सुरवसे, धम्मदीप कांबळे, भिम कांबळे, सोजरबाई कांबळे,साखराबाई गायकवाड, फातिमा शारवाले सह युवा कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.