वागदरी ,दि.१७ :


तुळजापूर तालुक्यातील मौजे होनाळा येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून भिमगीत गायनासह भव्य मिरवणुकीने बुद्ध जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
  
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी होनाळा ता.तुळजापूरच्या वतीने विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंती निमित्त भिमगित गायणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    याप्रसंगी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून येथील भिमनगर मध्ये आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत प्रा.एम.एम.मस्के, परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारूती बनसोडे यांच्या हस्ते व सरपंच आमृत जाधव, सोसायटीचे चेअरमन शिवाजी भोसले, प्रा.डी.डी.मस्के, रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस. के.गायकवाड,  तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, प.स.चे आभियंता बी.एल.वाघमारे आदींंच्या प्रमुख उपस्थितीत तथागत भगवान गौतम बूध्द यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
  

 भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून सहवादय लेझीम पथकाने भव्य मिरवणुक काढण्यात आली.
  

यावेळी एस.बी.कोळेकर गुरुजी,पत्रकार अजित चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे आरविंद चंदनशिवे,जयंती उत्सव कमिटीचे बाबा मस्के, सातलिंग मस्के, प्रा.अशांक मस्के, शहाजी मस्के, अंकुश चंदनशिवे, रोहन मस्के, महेश मस्के, सागर चंदनशिवे, सोहम मस्के, करुणा सागर तरुण मंडळ वडगाव (लाख),न्यू.भिम गर्जना तरुण मंडळ बारूळ,पंचशील तरुण मंडळ बामणी, भिम दर्शन तरुण मंडळ खामसवाडी आदी लेझीम संघासह महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 
याप्रसंगी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदीनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
Top