मुबंई , दि . १०

सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरीत करून लवकरात लवकर हा प्रकल्प चालू करण्यात यावा, असा प्रस्ताव  केंद्रीय  रेल्वे बोर्डाचे सदस्य बिभिसन जाधव यांनी एका आयोजित बैठकीत मांडल्याचे बोलताना सांगितले .


 दि. 8 जुलै रोजी मुंबई येथे सेंट्रल रेल्वे बोर्डची बैठक संपन्न झाली. यावेळी सेंट्रल रेल्वे बोर्डचे  महाप्रबंदक अनिलकुमार लहुटी, व उपमहाप्रबंधक दिवेकांत चंद्रकर व सेंट्रल रेल्वे बोर्डचे सदस्य व सोलापूरचे खासदार डाँ जय सिध्देश्वर  महाराज तसेच सेंट्रल रेल्वे बोर्डचे सदस्य व महाराष्ट्र विधान परिषद सदस्य सौं. उमा खापरे, सेंट्रल रेल्वे बोर्डचे सदस्य   बिभिषण जाधव आदीसह अन्य काही सदस्य, सेंट्रल रेल्वे बोर्डचे RPF IG अजय सदाने व इतर रेल्वे अधिकारी उपस्थित होते. 

सदर प्रसंगी  बिभिषण जाधव यांनी सोलापूर - तुळजापूर -उस्मानाबाद रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर व्हावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला  देऊन, जमिनीचे निरीक्षण केल्यानंतर कामे चालू करून देण्यात यावा हा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्याकडून जमीन हसतांतरित करून लवकरत लवकर हा प्रकल्प चालू करण्यात यावा हा प्रस्ताव  बिभिषण जाधव यांच्याकडून बैठकित  मांडण्यात आला.सदर प्रकल्पसाठी 904.92 करोड निधी  केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले .
 
Top