तुळजापूर, दि. ७
महाराष्ट्रामध्ये सरकार कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांची बैठक घेतली आणि तुळजापूर तालुक्यात संपर्क कार्यालय चालू करून शिवसेनेची बांधणी भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे, माजी उप जिल्हाप्रमुख श्याम पवार, जि प सदस्य सोमनाथ गुड्ड, शहर प्रमुख सुधीर परमेश्वर, माजी जि प सदस्य राजअहमद पठाण, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख लखन परमेश्वर, बाजार समितीचे उपसभापती संजय भोसले, ज्येष्ठ नेते कमलाकर चव्हाण, सुनील जाधव, मेजर राजेंद्र जाधव, उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर, सागर इंगळे बापूसाहेब नाईकवाडी, सिद्धाराम कारभारी, अर्जुन साळुंखे, काशिनाथ भोरे, विकास सुरवसे, विकास भोसले, सरदारसिंग ठाकूर ,प्रदीप भोसले, संजय भोसले, प्रसाद भोसले, चेतन बंडगर रोहित चव्हाण, नेताजी महाबोले ,श्याम कनकधर, कृष्णात मोरे, दगडू शिंदे ,अनिल बोबडे ,तुळशीराम बोबडे आदी प्रमुख यावेळी उपस्थिती होती.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ उद्धव ठाकरे यांना मानणारी शिवसेना आहे. जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य असून यापुढील काळात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचाराने सर्व तालुक्यात शिवसेना भक्कमपणे काम करणार आहे. जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यात लवकरच शिवसेनेचे संपर्क कार्यालय सुरू करून तालुक्यातील लोकांना संपर्क होण्यासाठी व्यवस्था केली जाईल असे सांगितले.
या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल पवार यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांनी आपले विचार मांडले.
आगामी काळात आपण उस्मानाबाद जिल्ह्यात स्वतंत्र आणि भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी नव्या उमेदीने काम करू, निष्ठावंत शिवसैनिकांना सदैव मान दिला जाईल या कामांमध्ये शिवसैनिक केंद्रबिंदू समजून शिवसेनेचे कामकाज पाहिले जाईल. तुळजापूर तालुक्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत लवकरच शिवसैनिकांचा मेळावा घेतला जाईल अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव म्हणून केले, रेंगाळत पडलेले वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले, ७ टीएमसी पाण्याचा प्रश्न सोडवला असे महत्त्वाचे निर्णय घेतले. यापुढील काळात शिवसेना अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार आहे. शिवसेना पक्षाने मला भरपूर दिले आहेत. त्यामुळे आपण निष्ठा बदलली नाही. शिवसेनेमध्ये निष्ठेला सर्वाधिक महत्त्व आहे. अशा शब्दात जिल्हा महिला आघाडी प्रमुख शामल पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले